61 टक्के दिल्लीकर केजरीवालांच्या कामगिरीवर नाखूश : सर्व्हे
By admin | Published: February 9, 2017 05:32 PM2017-02-09T17:32:45+5:302017-02-09T17:32:45+5:30
येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले सरकार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्थानिक मुद्यांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत सर्वांवर हिरिरीने आपले मत मांडतात. मात्र केजरीवाल यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाबाबत तब्बल 61 टक्के दिल्लीकर मात्र नाखूश असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे.
संध्या टाइम्सने केलेल्या या सर्व्हेमध्ये 61 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की ते केजरीवाल सरकारच्या कामगिरीवर नाखूश आहेत. तर 34 टक्के लोकांनी दिल्ली सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र 4 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही मत नोंदवलेले नाही. संध्या टाइम्सने 550 लोकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत हा सर्व्हे केला आहे. या सर्वेत भ्रष्टाचार, जनलोकपाल, केंद्र सरकारसोबतचे विवाद आणि महिला संरक्षण या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले होते.
एकीकडे आप सरकारची लोकप्रियता कमी झालेली असतानाच केजरीवाल यांच्या लोकप्रियतेतही कमालीची घट झाली आहे. केजरीवाल आणि भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना मुख्यमंत्रीपदारचे उमेदवार म्हणून समसमान पसंती मिळाली आहे. दोघांनाही प्रत्येकी 31.64 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसच्या अजय माकन यांना 18 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तसेच जनलोकपाल लागू करण्यात आणि भ्रष्टाचार कमी करण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरल्याचे मतही बहुसंख्य मतदारांनी नोंदवले आहे.