एकाच दिवशी बांधले ६१ वनराई बंधारे अकोला तालुक्यातील बंधार्‍यांचा समावेश

By admin | Published: October 3, 2015 02:31 AM2015-10-03T02:31:02+5:302015-10-03T02:31:02+5:30

अकोला: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर शुक्रवारी एकाच दिवशी अकोला तालुक्यात ६१ वनराई बंधारे बांधण्यात आले.

The 61 forested bunds built on the same day include the bunds of Akola taluka | एकाच दिवशी बांधले ६१ वनराई बंधारे अकोला तालुक्यातील बंधार्‍यांचा समावेश

एकाच दिवशी बांधले ६१ वनराई बंधारे अकोला तालुक्यातील बंधार्‍यांचा समावेश

Next
ोला: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर शुक्रवारी एकाच दिवशी अकोला तालुक्यात ६१ वनराई बंधारे बांधण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या जयंतदिनी जिल्ह्यात विविध विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अकोला तालुक्यातील विविध गावांमध्ये एकाच दिवशी ६१ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यामध्ये महसूल विभाग २०, कृषी विभाग २४ आणि पंचायत समितीमार्फत १७ वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधार्‍यांद्वारे नदी-नाले, बंधार्‍यांमधील पाणी अडविण्यात आले असून, यामुळे वाहून जाणारे पाणी अडणार आहे. त्याद्वारे जलसंधारणाला चालना मिळणार आहे. वनराई बंधारे बांधण्याच्या या विशेष मोहिमेत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी डी.एस.बचुटे, तालुका कृषी अधिकारी जवंजाळ यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच व शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला.

Web Title: The 61 forested bunds built on the same day include the bunds of Akola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.