कोठडीत ६१ जणांचा मृत्यू
By admin | Published: March 27, 2016 12:03 AM2016-03-27T00:03:29+5:302016-03-27T00:03:29+5:30
गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या
अहमदाबाद : गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
मंगळवारी विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आलेल्या अहवालात जीएसएचआरसीने सांगितले की, पोलीस अथवा न्यायालयीन कोठडीत असताना झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५१ प्रकरणे नैसर्गिक मृत्यूची आहेत. सात जणांनी आत्महत्या केली, तर तिघांचे अनैसर्गिक मृत्यू झाले.
कोठडीत झालेल्या एकूण मृत्यूपैकी आठ जण पोलिसांच्या ताब्यात असताना, तर ५३ न्यायालयीन कोठडीत झाल्याचे अहवालात नमूद आहे.
कोठडीतील मृत्यूच्या सर्वाधिक म्हणजे २४ घटना एकट्या अहमदाबाद शहरातील असून, बडोदा शहर दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे न्यायालयीन कोठडीत १० लोकांचा मृत्यू झाला. जुनागडमध्ये ही संख्या चार आहे. (वृत्तसंस्था)