Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 05:49 AM2018-10-20T05:49:31+5:302018-10-20T07:19:41+5:30

#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली.

61 people watching Ravan dhahan crashed with the train | Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले

Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले

Next

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या अमृतसरच्या भीषण दुर्घटनेत ६१हून अधिक जण ठार, तर ७२ जण जखमी झाले. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या १००वर जाण्याची शक्यता आहे.


रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते. रावणदहनावेळी फटाके फुटू लागल्याने त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील ३०० हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळांत जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहाण्यात व त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करण्यात इतके मश्गुल होते की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरून ट्रेन येत असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसºया ट्रेनखाली आले. थरकाप उडविणाºया या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यास तिथे हजर असलेल्यांपैकीच अनेक जण पुढे सरसावले. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले.

दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला व मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली. रेल्वे अधिकाºयांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केले. या मदतकार्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल लक्ष ठेवून आहेत. अमेरिका दौºयातील सर्व कार्यक्रम रद्द करून पीयूष गोयल भारतात परत येत आहेत.

जीव वाचविण्याची संधी मिळाली नाही
जालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता धावपळ करायची उसंतही मिळाली नाही.

Web Title: 61 people watching Ravan dhahan crashed with the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.