शरद पवार, ज्योतिरादित्य सिंधियांसह ६२ खासदार आज शपथ घेणार, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:45 AM2020-07-22T08:45:40+5:302020-07-22T08:49:58+5:30

देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेले ६२ खासदार बुधवारी शपथ घेतील. जे खासदार आज येऊ शकणार नाहीत, त्यांची अधिवेशनावेळी सभागृहात शपथ घेतली जाईल.

62 MPs including Sharad Pawar, Jyotiraditya Scindia to be sworn in today, swearing in of newly elected Rajya Sabha MPs | शरद पवार, ज्योतिरादित्य सिंधियांसह ६२ खासदार आज शपथ घेणार, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी

शरद पवार, ज्योतिरादित्य सिंधियांसह ६२ खासदार आज शपथ घेणार, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी

googlenewsNext
ठळक मुद्देआज शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आज शपथ घेणार आहेत. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत होणार नाही तर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये होणार आहे. सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. 

देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेले ६२ खासदार बुधवारी शपथ घेतील. जे खासदार आज येऊ शकणार नाहीत, त्यांची अधिवेशनावेळी सभागृहात शपथ घेतली जाईल. आज शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी दरम्यान सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली जाणार आहे. तसेच, जे खासदार शपथ घेणार आहेत. ते फक्त एकाच व्यक्तीला आपल्याबरोबर या शपथविधी सोहळ्यासाठी आणू शकतील, अशा सूचना निवडून आलेल्या सर्व खासदारांना आधीच देण्यात आल्या आहेत.

शपथविधीनंतर महाराष्ट्रातील आरपीआयचे रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, राष्ट्रवादीचे शरद पवार, भाजपाचे उदयनराजे भोसले हे संसदेच्या वरच्या सभागृहात दिसणार आहेत. तसेच,  माजी पंतप्रधान आणि जनता दल-सेक्युलरचे प्रमुख एचडी देवगौडा दीर्घकाळानंतर राज्यसभेत हजर होतील. २०१४ ते २०१९ दरम्यान लोकसभेत काँग्रेसचे नेते असलेले मल्लिकार्जुन खड़गे यावेळी राज्यसभेत दिसतील.

हरिवंश नारायण सिंह बिहारमधून जेडीयूच्या तिकिटावर पुन्हा एकदा राज्यसभेवर पोहोचले आहेत. जेडीयू नेते रामनाथ ठाकूर हे राज्यसभा सदस्याचे सदस्यत्वही घेतील. आरजेडीमधून प्रेमचंद गुप्ता आणि अमरेंद्रधारी सिंह यांची निवड झाली आहे. तर विवेक ठाकूर हे भाजपाच्या कोट्यातून निवडून आले आहेत. 

आणखी बातम्या...

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा

आता चीनच्या अडचणी वाढणार, मोदी सरकार नवीन नियम लागू करणार

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

Web Title: 62 MPs including Sharad Pawar, Jyotiraditya Scindia to be sworn in today, swearing in of newly elected Rajya Sabha MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.