धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 12:50 PM2017-08-03T12:50:21+5:302017-08-03T13:19:59+5:30

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये वेणी कापणारी चेटकीण समजून एका वृद्ध महिलेला जबर मारहाण करण्यात आली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला

62 years old lady beaten to death by villagers over ghost rumour | धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देवृद्ध महिलेला वेणी कापणारी चेटकीन समजून जबर मारहाण करण्यात आलीआग्रामधील फतेहबाद येथे ही घटना घडली आहेपोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे

आग्रा, दि. 3 - राजस्थान, दिल्ली - एनसीआर येथे महिलांची वेणी कापली जात असल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच काही लोकांनी एका वृद्ध महिलेला वेणी कापणारी चेटकीण समजून जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आग्रामधील फतेहबाद येथे ही घटना घडली आहे. 

फतेहबादमधील मगटई गावात रात्री उशिरा एका महिलेची वेणी कापली गेली होती. सकाळी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर एका वृद्द महिलेला फिरताना पाहून तिच्यावर संशय घेण्यात आला. यानंतर त्या वृद्ध महिलेला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.  

मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव माना देवी असं होतं. शौचास गेल्या असता रात्रीच्या अंधारात रस्ता भरकटल्याने त्या चुकून दुस-या वस्तीमध्ये पोहोचल्या. यावेळी एका तरुणीने त्यांना पाहताच आरडाओरड सुरु केला. आरडाओरड ऐकून गावकरी जमा झाले आणि चेटकीण असल्याचं समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि न्यायाची मागणी केली. आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबिय करत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी सध्या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण...
देशातील चार राज्यांमध्ये महिलांची वेणी कापणाऱ्या मांजरीची दहशत पसरली आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये महिलांनी अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत असा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

लोकांचा जागता पहारा
गुरुग्रामधील देवीलाल कॉलनीमधील महिला तर रात्री झोपताना डोक्याला कपडा बांधून झोपत आहेत. तर, परिसरातील काही लोक रात्री पहारा देत आहे. याचबरोबर पोलिसांकडून लोकांना अफवांवरती विश्वास ठेऊ असे आवाहन करण्यात येत आहे. 

हरियाणामधील फतेहाबाद जिल्ह्यातील महिलांनी तर दृष्ट आत्मा म्हणजेच भूतांकडून केस कापत आहेत असा दावा केला आहे. तसेच, परिसरातील लोकांनी सांगितले की, महिलांच्या वेण्या आणि केस कापल्याचा आठ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिने दिलेल्या माहितीनुसार, फतेहाबादच्या पोलीस आयुक्तांनी महिलांचे केस कापणा-या व्यक्तींची माहिती देईल, त्याला 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येईल असे जाहीर केले आहे. 
 
घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम...
काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेण्या घालणंच दिले सोडून...
केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेण्या घालणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.

Web Title: 62 years old lady beaten to death by villagers over ghost rumour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.