६३वे राष्ट्रीय पुरस्कार - बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
By admin | Published: March 28, 2016 10:58 AM2016-03-28T10:58:08+5:302016-03-28T13:04:22+5:30
६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून आबालवृद्धांना भुरळ घालणा-या 'बाहुबली' चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २८ - सर्वोच्च मानाचे समजले जाणा-या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून आबालवृद्धांना भुरळ घालणा-या 'बाहुबली' चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि बॉलवूडची 'क्वीन' कंगना राणeवतला दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार यादी :
वडील व मुलीदरम्यानचे नाते सांगणा-या 'पिकू' चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'क्वीन' चित्रपटात आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीपणे वाजवल्यानंतर कंगनाने मागे वळून पाहिलचं नाही. 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटात डबल रोल करणा-या कंगनाला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला असून तिला तिस-यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी तिला फॅशन चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा तर क्वीनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
आपल्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय लीला भन्साळी यांनी यावर्षी 'बाजीराव-मस्तानी' ही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर आणली. या चित्रपटातील अनेक प्रसंग, गाणी यामुले वागही निर्माण झाला , पण रसिकांनी हा चित्रपट उचलून धरला. याच चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( ज्युरी) - कल्की ( मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी ( बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा कै हैशा
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - रेमो डिसूझा ( बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट गायिका- मोनाली ठाकर (मोह मोह के धागे, दम लगा कै हैशा)
सर्वोत्कृष्ट पटकथा - विशाल भारद्वाज ( तलवार)
सर्वोत्कृष्ट संवाद (विभागून) - जुही चतुर्वेदी (पिकू) आणि हिंमाशू शर्मा ( तनू वेड्स मनू रिटर्न्स)
विशेष दखल - व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट - हरीश भिमानी ( मला लाज वाटते)
विशेष दखल - रिंकू राजगुरू (सैराट)