देशात ६४.५३ टक्के बरे, मृत्युदर २.१५ टक्के, जगात सर्वांत कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:56 AM2020-08-02T06:56:00+5:302020-08-02T06:56:32+5:30
जुलै २०२० मध्ये वस्तू व सेवाकराचे संकलन जूनच्या तुलनेत घसरले. जूनमध्ये ९०,९१७ कोटी असलेले संकलन जुलैमध्ये ८७,४२२ कोटी राहिले.
नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ५७,११८ नवे रुग्ण सापडले असून ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ आहे. एकूण रुग्णांची संख्या १७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. १०,९४,३७४ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६४.५३ टक्के असून मृत्यूदर अवघा २.१५ टक्के आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतातील मृत्यूदर सर्वात कमी आहे.
जुलै महिन्यात रुग्णसंख्या दुप्पट
लॉकडाऊनमधील निर्बंध जुलैमध्ये शिथील केले तसेच अनेक व्यवहार सुरळीत झाले. मात्र त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा फैलावही जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर झाला. जून महिन्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपेक्षा जुलै महिन्यातील संख्या दुप्पट झाली.
जीएसटी संकलनात जुलैमध्ये घसरण
जुलै २०२० मध्ये वस्तू व सेवाकराचे संकलन जूनच्या तुलनेत घसरले. जूनमध्ये ९०,९१७ कोटी असलेले संकलन जुलैमध्ये ८७,४२२ कोटी राहिले. जुलैमधील संकलन मे व एप्रिलच्या संकलनाच्या तुलनेत अधिक आहे. मेमध्ये ६२,००९ कोटी, तर एप्रिलमध्ये ३२,२९४ कोटींचे संकलन झाले होते. जुलै २०१९ मध्ये १.०२ लाख कोटींचे संकलन झाले होते. त्या तुलेत यंदाच्या जुलैमधील संकलन ८६ टक्के आहे.