सांगोल्यात ६५ कि.मी.ची भुयारी गटार योजना ४९ कोटींचा निधी; मुख्याधिकार्‍यांची माहिती

By admin | Published: August 11, 2015 10:23 PM2015-08-11T22:23:15+5:302015-08-11T22:23:15+5:30

सांगोला : सांगोला शहर व उपनगरातील यलो झोन आणि गावठाण हद्दीत आरोग्याच्या दृष्टीने १११ पैकी ९३ कि.मी.भुयारी गटारी योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४९.७५ कोटी रु.खर्चून ६५ कि.मी.भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव नगरपरिषदेने शासनाला सादर केल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.

65 km of underground drainage scheme in Sangoli, Rs. 49 crore; Chief Information | सांगोल्यात ६५ कि.मी.ची भुयारी गटार योजना ४९ कोटींचा निधी; मुख्याधिकार्‍यांची माहिती

सांगोल्यात ६५ कि.मी.ची भुयारी गटार योजना ४९ कोटींचा निधी; मुख्याधिकार्‍यांची माहिती

Next
ंगोला : सांगोला शहर व उपनगरातील यलो झोन आणि गावठाण हद्दीत आरोग्याच्या दृष्टीने १११ पैकी ९३ कि.मी.भुयारी गटारी योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४९.७५ कोटी रु.खर्चून ६५ कि.मी.भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव नगरपरिषदेने शासनाला सादर केल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.
पुणे, मुंबई, सोलापूर, पंढरपूर आदी शहराच्या धर्तीवर सांगोला नगरपरिषद प्रशासनाकडून शहर उपनगरातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता व गटारीतील सांडपाण्याचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी भुयारी गटार योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पु्रडॉल कन्सल्टिंग प्रा.लि.चे कमलेश्वर वाघ, सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीचे प्रा.पी.सी.झपके, नगरसेवक मारुती बनकर, मधुकर कांबळे, इमाम मणेरी, तानाजीकाका पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत भुयारी गटारी योजना राबविण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
सांगोला शहर व उपनगरातील यलो झोन आणि गावठाण हद्दीत मार्च-एप्रिलमध्ये १११ कि.मी.लांबीच्या भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नगरपरिषदेने १११ पैकी ९३ कि.मी.भुयारी गटार योजनेचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात ६५ कि.मी.भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. तर दुसर्‍या टप्प्यात १५ कोटी रु.खर्चून २८ कि.मी.लांबीच्या लोकवस्तीनुसार नागरिकांच्या सूचनेवरुन भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ६५ कि.मी.भुयार गटार योजनेसाठी ४९.७५ कोटी रु.खर्च येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर दीड ते दोन वर्षात संपूर्ण ९३ कि.मी.लांबी गटार योजनेची कामे पूर्ण होणार असल्याची माहिती सांगण्यात आली.
शेती व औद्योगिकला उपयोग
शहर व उपनगरातील भुयारी गटार योजनेतून एका जागी जमा झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रियेद्वारे मिळणार्‍या पाण्याचा उपयोग शेती व औद्योगिक व्यवसायासाठी वापर करता यावा, असे नगरपरिषदेचे नियोजन राहणार आहे.
कोट
शहर व उपनगरातील नागरिकांना भुयारी गटार योजना आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. भुयारी गटार योजनेमुळे पाणी वाचण्यास मदत मिळणार असून, डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांना आरोग्यमुक्त जीवन जगण्यास त्रास होणार नाही़
- रमाकांत डाके
मुख्याधिकारी, सांगोला नगरपालिका

Web Title: 65 km of underground drainage scheme in Sangoli, Rs. 49 crore; Chief Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.