सहायक पोस्टमास्तरकडे ६८ लाखांची मालमत्ता; सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 06:55 AM2022-10-28T06:55:26+5:302022-10-28T06:55:56+5:30
झारखंड राज्यातील धनबाद येथील पोस्टात सहायक पोस्टमास्तर पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा कार्यभार होता.
मुंबई : : सहायक पोस्टमास्तर पदावर कार्यरत असताना, आपल्या अखत्यारित असलेली विविध कामे करून देण्यासाठी लाचखोरी करत आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ८७ टक्के अधिक मालमत्ता गोळा करणाऱ्या पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे, तसेच त्याची चल-अचल अशी ६८ लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केली आहे.
झारखंड राज्यातील धनबाद येथील पोस्टात सहायक पोस्टमास्तर पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा कार्यभार होता. त्याच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. २०१४ मध्ये या अधिकाऱ्याची मालमत्ता केवळ ५३ हजार १९० रुपये इतकी होती. मात्र, सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत एकीकडे पोस्टाच्या कामांतील त्याच्या जबाबदाऱ्यांत जसजशी वाढ होत गेली, तसतशी त्याच्या मालमत्तेमध्येही वाढ झाल्याचे तपासात दिसून आले. २०१९ पर्यंत या अधिकाऱ्याकडे ६८ लाख रुपयांची चल-अचल मालमत्ता असल्याचे दिसून आले.
२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याला पगार, भत्ते आणि त्याच्या मुदत ठेवी, तसेच अन्य गुंतवणुकीवरील परताव्यापोटी एकूण ७० लाख रुपयांचे अधिकृत उत्पन्न मिळाले होते. यापैकी ६३ लाख ३९ हजार रुपये खर्च झाल्याचेही दिसून आले. मात्र, या व्यतिरिक्त त्याच्याकडे ६८ लाख रुपयांची जी मालमत्ता सापडली.