६८ वा प्रजासत्ताक दिन : राजपथावर पार पडला दिमाखदार सोहळा

By admin | Published: January 26, 2017 10:02 AM2017-01-26T10:02:03+5:302017-01-26T11:40:24+5:30

भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात उत्साहाने साजरा होत असून राजधानी दिल्लीतही राजपथावर भारतीय सैन्याच्या संचलनाला सुरुवात झाली आहे

68th Republic Day: A celebratory ceremony on the Rajpath | ६८ वा प्रजासत्ताक दिन : राजपथावर पार पडला दिमाखदार सोहळा

६८ वा प्रजासत्ताक दिन : राजपथावर पार पडला दिमाखदार सोहळा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात उत्साहाने साजरा होत असून राजधानी दिल्लीतही राजपथावर भारतीय सैन्याच्या संचलनाला सुरुवात झाली आहे. अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह दिग्गज नेतेमंडळीही हजर आहेत. 
अबुधाबीचे राजपुत्र यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असल्याने संयुक्त अरब अमिरातीचे १४९ सैनिक यंदा राजपथावर संचलन करणार आहेत. यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे (ब्लॅक कॅट्स) राजपथावरील संचलनाचे वैशिष्ट्य असणार आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग घेणार आहेत. 
 
-  राजपथावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे आगमन, पंतप्रधान मोदींनी केले स्वागत.
 
-   अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान सोहळ्यासाठी उपस्थित.
 
-  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान. 
 
-  राजपथावर शौर्य, संस्कृती, लष्करी सामर्थ्याचे दर्शन.
 
-  दुबईचे सैन्यपथकही राजपथावरील संचलनात सहभागी.
 
-  रणगाडा पथकाने दिली राष्ट्रपतींना मानवंदना. स्वदेशी धनुष तोफ लवकरच राजपथावर.
 
- सीमा सुरक्षा दलाचे राजपथावर संचालन
 
- उंटांचे एकमेव पथक राजपथावर दाखल.
 
-  नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे पहिल्यांदाच राजपथावर संचलन
 
- महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर, लोकमान्य टिळकांना चित्ररथातून वाहण्यात आली आदरांजली.
 
- ओडिशा, अरुणाचल प्रदेशाचे चित्ररथही राजपथावर दाखल.
 
-  चित्ररथाच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक ठेवा राजपथावर दाखल.
 
-  जीएसटीचे महत्त्व सांगणारा चित्ररथ राजपथावर दाखल.
 
-  शौर्य पुरस्कार विजेती लहान मुले राजपथावरील संचलनात सहभागी.
 
- राजपथावरील संचलनात जवानांनी मोटारसायकलवर दाखवल्या चित्तथरारक कसरती.
 
- हवाई दलाच्या मिग विमानांनी घेतली भरारी
 
-  सी-१७ ग्लोबमास्टर विमानांनी दाखवले प्रात्यक्षिक
 
- ३ सुखोई विमानांनी आकाशात घेतली भरारी.
 

Web Title: 68th Republic Day: A celebratory ceremony on the Rajpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.