गोरखपूरच्या रुग्णालयात पुन्हा ६९ बालमृत्यू, ७ महिन्यांत ८२३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:10 AM2017-10-14T04:10:18+5:302017-10-14T04:10:40+5:30
बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या चार दिवसांत ६९ मुलांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० आॅक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ आॅक्टोबरला झाला.
गोरखपूर : बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या चार दिवसांत ६९ मुलांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० आॅक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ आॅक्टोबरला झाला.
बहुतेक मृत्यू हे नवजात अर्भकांचे किंवा मेंदूला आलेल्या तीव्र सुजेमुळे झाले आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी सांगितले. आॅगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती. (वृत्तसंस्था)
७ महिन्यांत ८२३ मृत्यू-
या सरकारी रुग्णालयात वारंवार बालमृत्यू होत आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये १५२, फेब्रुवारीत १२२, १५९ मार्चमध्ये, १२३ एप्रिलमध्ये, मेमध्ये १३९, १३७ जूनमध्ये तर जुलैमध्ये १२८ मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाले आहेत.