Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 08:31 AM2020-08-09T08:31:29+5:302020-08-09T08:56:30+5:30

विजयवाडातील हॉटेलला भीषण आग; सात जणांचा मृत्यू; 30 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश

7 killed fire hotel being used Covid-19 facility Andhra Pradesh’s Vijawada | Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Next

आंध्र प्रदेश - गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशमधील विजयवाडामध्ये एका हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या हॉटेलचं रुपांतर हे कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास सात लोकांचा मृत्यू झाला असून 30 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलालाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील स्वर्णा पॅलेस हॉटेलमध्ये रविवारी (9 ऑगस्ट) सकाळी भीषण आग लागली आहे. या हॉटेलचं रुपांतर हे कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं असून तिथे रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागली त्यावेळी जवळपास 50 जण हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. यातील 40 जण हे कोरोनाग्रस्त होते. या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलला ही आग लागली होती. कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलला आग लागल्यानंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या 35 रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर

Web Title: 7 killed fire hotel being used Covid-19 facility Andhra Pradesh’s Vijawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.