लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:52 AM2023-07-11T10:52:19+5:302023-07-11T11:00:18+5:30
प्रकाशम जिल्ह्यातील सागर कनाल दरीत ही बस कोसळल्याची घटना घडली
हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात आज मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. लग्न समारंभासाठी जात असलेली बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन अपघास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
प्रकाशम जिल्ह्यातील सागर कनाल दरीत ही बस कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर, सर्वप्रथम स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मग, प्रशासकीय यंत्रणालाही कामाला लागली होती. या दुर्घनटेत आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आंध्र प्रदेश महामंडळाची ही बस काकीनाडा येथून निघाली होती. लग्नकार्यासाठी प्रवाशांच्यावतीने ही बस भाड्याने घेण्यात आली होती.
Andhra: 7 killed after bus carrying wedding party falls into Sagar Canal in Prakasam district
— ANI Digital (@ani_digital) July 11, 2023
Read @ANI Story | https://t.co/djmDfDBexC#AndhraPradesh#accident#Prakasampic.twitter.com/ziEevdOEgi
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यालयातून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये, अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, जखमींवरील उपचारासाठी तात्काळ आधुनिक यंत्रणा आणि उपचारपद्धतीचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.