खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी
By admin | Published: August 2, 2016 11:18 PM2016-08-02T23:18:46+5:302016-08-02T23:18:46+5:30
जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Next
ज गाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मॉल प्रशासनाने २३ मार्च रोजी २०१४ रोजी मुंबई येथून ४९ एलईडी मागवले होते, त्यापैकी दोन एलईडी मॉलसाठी काढण्यात आले होते तर उर्वरित स्टोअर रुममध्ये ठेवले होते. सुरक्षा पर्यवेक्षक संदीप अशोक सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) हे नेहमी प्रमाणे सोमवारी कामाला आले. त्यांना दुपारी बारा वाजता स्टोअर रुमचे कुलूप बदललेले दिसले. त्यांनी हा प्रकार व्यवस्थापक पंकज दुबे यांना सांगितला. त्यांनी पाहणी केली असता रुममध्ये ४० एलईडी दिसून आल्या तर सात एलईडी गायब झालेल्या होत्या. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे, त्यांची नावेही पोलिसात देण्यात आली आहे.