"पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:47 AM2024-08-02T10:47:37+5:302024-08-02T10:51:15+5:30

डेरेक ओब्रायन गुरुवारी म्हणाले, पंतप्रधान मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

7 out of 10 ministers belong to RSS in PM narenda Modi's government TMC leader derek o brien's big claim | "पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा

"पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सभागृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) प्रशंसा केल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात काँग्रेससह अनेक पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. यातच, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते डेरेक ओब्रायन यांनी दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 10 पैकी 7 मंत्री आरएसएसशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातही याच प्रकारचे विधान केले आहे.
 
डेरेक ओब्रायन गुरुवारी म्हणाले, पंतप्रधान मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. टीएमसी नेत्याने नुकताच लिहिलेला एक लेख एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "मोदी आरएसएसच्या गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांची आसएसेसवर टीका केलेली एक पोस्ट देखील शेअर केली आहे. 

आरएसएस समर्थकांना सैनिक शाळा चालवण्याचे ठेके - डेरेक ओब्रायन
आपल्या ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या लेखात ओब्रायन यांनी म्हटले आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये 10 पैकी 7 मंत्री संघ परिवाराशी संबंधित आहेत. 10 पैकी चार राज्यपाल माजी प्रचारक तथा आरएसएस आणि त्याच्या सहकारी संघटनांचे स्वयंसेवक आहेत. तसेच भाजपचे सरकार असलेल्या 12 राज्यांपैकी आठ राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही स्वयंसेवक आहेत. याशिया, सैनिकी शाळा चालविण्याचे 10 पैकी 8 ठेके आरएसएस समर्थकांना अथवा संबंधित संघटनांना देण्यात आले आहेत.

आरएसएसवर तीन वेळा घालण्यात आली आहे बंदी -
ओब्रायन म्हणाले, आरएसएसने भारतीय स्वातंत्र्य संग्रामापासून स्वतःला दूर ठेवले आणि 1930 च्या दशकात महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा अथवा मिठाचा सत्याग्रह सुरू केला, तेव्हा आरएसएसचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांनी, यात संघटना भाग घेणार नाही, अशी घोषणा केली होती. याशिवाय, देश स्वतंत्र झाल्यानंतर, भारत सरकारने संघावर तीन वेळा बंदी आणली होती, असेही ते म्हणाले. 

Web Title: 7 out of 10 ministers belong to RSS in PM narenda Modi's government TMC leader derek o brien's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.