रायपूरमधील चर्चमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी 7 जणांना अटक
By admin | Published: March 7, 2016 12:26 PM2016-03-07T12:26:24+5:302016-03-07T12:26:24+5:30
रायपूरमधील चर्चमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन सापडलेल्या 3 दुचाकींच्या आधारावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
छत्तीसगड, दि. ७ - रायपूरमधील चर्चमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन सापडलेल्या 3 दुचाकींच्या आधारावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. रायपूरमधील कछना परिसरात रविवारी ही घटना घडली आहे.
रविवारी संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी 25 जणांनी येऊन उपस्थितांना मारहाण करत चर्चची तोडफोड केली होती. हल्ला करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही लोक 'जय श्री राम'च्या घोषणा देत चर्चमध्ये घुसले, त्यांनी महिला आणि पुरुषांना मारहाण केली. त्यावेळी 65 लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी उपस्थित होते अशी माहिती एका साक्षीदाराने दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी अगोदरच अहवाल मागवला आहे. प्रशासनाने कारवाई केली आहे, आरोपींची गय केली जाणार नाही असं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे.