आजारी कुत्र्याला वाचवताना छत्तीसगडमध्ये ७ जवान झाले शहीद

By admin | Published: April 2, 2016 12:11 PM2016-04-02T12:11:44+5:302016-04-02T12:23:34+5:30

आजारी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेतानाच झालेल्या स्पोटात सीआरपीएफचे जवान शहीद झाले.

7 soldiers shot dead in Chhattisgarh | आजारी कुत्र्याला वाचवताना छत्तीसगडमध्ये ७ जवान झाले शहीद

आजारी कुत्र्याला वाचवताना छत्तीसगडमध्ये ७ जवान झाले शहीद

Next
>ऑनलाइन लोकमत
दंतेवाडा, दि. २ - अवघ्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडात भूसुरूंग स्फोटात सीआरपीएफचे ७ जवान शहीद झाले, मात्र या हल्ल्याबात एक नवी माहिती समोर आली आहे.. ती म्हणजे एका आजारी कुत्र्याला वाचवताना सीआरपीएफच्या या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजारी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेतानाच रस्त्यात भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि त्यात हे जवान शहीद झाले. 
बुधवारी दंतेवाडा येथे सीआरपीएफच्या 230 बटालियन तुकडीतील जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला व स्फोटात जवानांना जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी हे जवान स्काऊट नावाच्या बेल्जियन मॅलिनॉईस जातीचा प्रशिक्षित स्निफर कुत्र्याला जंगलात राहिल्याने डिहायड्रेशन झाल्याने आजारी पडला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी हे जवान 
त्याला प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. मात्र जंगलातून जाणा-या या रस्त्यावर नक्षलवादी हल्ल्याचीही भीती होती, त्या पार्श्वभूमीवर जवानांनी पूर्वतयारीही केली होती. हे सर्व जवान साध्या वेशात आणि सीआरपीएफच्या गाडीऐवजी टेम्पोमधून प्रवास करत होते. मात्र, तरीही नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केलाच. विशेष म्हणजे ज्या कुत्र्याला वाचवताना सात जवान शहीद झाले, त्या कुत्र्याने गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी लपवलेले भूसुरुंग शोधून काढले होते.

Web Title: 7 soldiers shot dead in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.