बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:31 PM2020-07-16T13:31:17+5:302020-07-16T13:37:18+5:30
जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत.
नवी दिल्लीः पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM-Kisan योजना ही मोदी सरकारची महत्त्वाची योजना असून, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली. पण पंतप्रधान किसान योजनेंतर्गत एका चुकीमुळे 70 लाख शेतकर्यांना 2000 रुपये मिळालेले नाहीत. कोणालाही अंदाजही नव्हता की, शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला दोन हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. कागदावरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळालेला नाही. जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत.
कुठे झाली चूक?- पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या नाव व बँक खाते क्रमांकामध्ये थोडा गोंधळ आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे. ज्यामुळे योजनेच्या प्रणालीतून अशा शेतकऱ्यांना बाहेर करण्यात आलं आहे, म्हणजे त्यांना लाभ मिळालेला नाही. पंतप्रधान किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18ला सांगितले की, 'अशा प्रकारची गडबड करणारे अर्जदार शेतकर्यांची संख्या सुमारे 70 लाखांच्या घरात आहे. तर जवळपास 60 लाख लोकांच्या आधार कार्डमध्ये गोंधळ आहे.
पडताळणीसाठी प्रलंबित सव्वा कोटी प्रकरणे : देशभरातील सुमारे 1.3 कोटी शेतकरी वार्षिक 6000 रुपयांच्या लाभापासून वंचित आहेत. असेही काही जिल्हे आहेत, जिथे सव्वा-सव्वा लाख शेतकऱ्यांची डेटा पडताळणीसाठी प्रलंबित आहे. जेव्हा राज्य सरकार शेतक-यांच्या तपशीलाची पडताळणी करून ते केंद्राकडे पाठवते, तेव्हा शेतक-याला पैसे मिळतात.
चूक कशी दुरुस्त होईल?: सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्याच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. आपले नाव केवळ चुकीचे असल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइनपद्धतीनं दुरुस्त करून घ्या. इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा.
हेही वाचा
धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा
देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका
जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात....
ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?
गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ
CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू