प्रवाशांच्या सेवेत ७० नव्या गाड्या; ९० रेल्वेगाड्यांचा विस्तार, १ ऑक्टोबरपासूनचे नवे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:37 AM2023-10-05T07:37:43+5:302023-10-05T07:37:54+5:30
रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले असून, १ ऑक्टोबर २०२३पासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
नवी दिल्ली :रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले असून, १ ऑक्टोबर २०२३पासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यात अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये रेल्वेच्या वेळापत्रकाची पुनर्रचना केली जाते. रेल्वेने मंगळवारी ते अधिकृतरीत्या जारी करण्यात आले. शहरांमधील संपर्क वाढविणे आणि वेळेत बचत करणे, या उद्देशाने नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकानुसार प्रस्थान व आगमन पडताळून घ्यावे, असे आवाहन रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.
कुठे मिळेल सर्व माहिती?
नव्या वेळापत्रकाला ‘ट्रेन्स ॲट अ ग्लान्स’ असे नाव दिले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. रेल्वेच्या टाइम टेबलची अथवा मार्गाच्या नकाशाची माहिती हवी असेल, तर ते ‘एनटीईएस’च्या अधिकृत वेबसाइटवर अथवा मोबाइल ॲपवर मिळते. रेल्वेची अधिकृत हेल्पलाइन १३९ वर कॉल करूनही माहिती घेतली जाऊ शकते.
वेळापत्रकात काय बदल?
वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या ६४ सेवांसोबत अन्य ७० नव्या गाड्या.
विद्यमान ९० गाड्यांचा विस्तार वाढवला आहे.
१२ रेल्वे सेवांची वारंवारिता वाढविली आहे.
२२ रेल्वे सेवांची गती वाढवून सुपरफास्ट श्रेणीत.
अग्नेय रेल्वेच्या वेळांमध्ये योग्य बदल.