'देशातील ७० टक्के लोकांना वाटतंय, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:43 PM2020-06-01T21:43:37+5:302020-06-01T22:48:22+5:30
युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे
मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्मच्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांनीही मोदींच्या कामाचं कौतुक करत, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील ७० टक्के लोकांची इच्छा असल्याचा दावाच केला आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ सरकारचा कार्यकाळच पूर्ण करणार नसून पुढील पंतप्रधानही तेच असावेत, अशी लोकांची भावना असल्याचे येदीयुरप्पा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आर्टीकल ३७० रद्द करत मोदींनी लोहपुरुष असल्याचं सिद्ध केलंय, असेही ते म्हणाले.
युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे. मोदींनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केलं असून देश त्यांच्या नेतृत्वात प्रगतीपथावर आहे. सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हा नारा देत मोदींनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला आहे. मजबूत आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मोदींचा प्रयत्न सुरु आहे. मोदींनी दिलेल्या‘वसुधैव कुटुम्बकम' या मंत्रामुळे न केवळ भारतात, याउलट जगभरात मोदींच्या नेतृत्वाची ओळख निर्माण झाली आहे.
मोदींनी, तीन तलाक कायदा, वंदे भारत मिशन, नागरिकता संशोधन कायदा, एक देश एक रेशनकार्ड, नवीन मोटारवाहन कायदे, राममंदिर वादावर तोडगा हे सर्व भाजपाची उपलब्धता असल्याचंही येदीयुरप्पा यांनी म्हटलं. कोरोना संकटाच्या काळातही १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने मजबूतीने लढा दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.