2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

By admin | Published: July 16, 2016 03:45 PM2016-07-16T15:45:10+5:302016-07-16T15:45:10+5:30

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत

707 Indians die in terror attacks since 2005 | 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 16 - भारतावर 2005 सालापासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी आणि मृत झालेल्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत. हथरस येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गौरव अग्रवाल यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून ही माहिती मागवली होती. 
 
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2 जानेवारीला पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 सुरक्षा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाने आपला जीव गमावला होता. 37 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही 2005 पासून 2 दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 11 जुलै 2006मध्ये लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये 187 लोकांनी आपला जीव गमावला, तर 817 जण जखमी झाले होते. यानंतर लगेचच दोन वर्षात मुंबईवर भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रामार्गे भारतात दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं  होतं. या हल्ल्यात एकूण 175 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. 291 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. 
 
दिल्लीलादेखील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 29 ऑक्टोबर 2005 मध्ये पहाडगंज, सरोजिनी नगर आणि डीटीसी बसमध्ये सिरिअल ब्लास्ट करण्यात आले. या स्फोटात 50 जण मृत्यूमुखी पडले तर 105 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला तर 156 जण जखमी झाले होते. 
 

Web Title: 707 Indians die in terror attacks since 2005

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.