72 तासांचा यादवी कलह पुर्वनियोजित?

By admin | Published: October 26, 2016 12:22 AM2016-10-26T00:22:25+5:302016-10-26T00:22:25+5:30

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्या परिवारात सुरू अललेल्या यादवीचे दररोज नवनवे अंक सादर होत आहेत.

72 hours of civil strife? | 72 तासांचा यादवी कलह पुर्वनियोजित?

72 तासांचा यादवी कलह पुर्वनियोजित?

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्या परिवारात सुरू अललेल्या यादवीचे दररोज नवनवे अंक सादर होत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अवघ्या  काही महिन्यांवर आलेल्या आहेत. त्यापुर्वी समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलहाने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच दैनिक भास्करच्या वृत्तानुसार सपामधील 72 तासांचा कलह पुर्वनियोजित होता. 24 वर्षानंतर यादव कुटुंबात जालेला हा कलह अखिलेश यादव यादवची प्रतिमा बळकट करण्यासाठी हा गोंधळ केला गेला होता. 
 
शिवपाल यांनी तर असे स्पष्टपणे म्हटले होते की, नेताजींनी (मुलायमसिंह) आता मुख्यमंत्री व्हायलाच हवे. त्याशिवाय ना पक्ष ना सरकार वाचू शकेल. आगामी निवडणूक मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात लढविली जाईल. मुलायम सिंह (७७) हे मुख्यमंत्री म्हणून परत सक्रिय होऊ शकतात, असेही शिवपाल यांनी सांगितले होते. तर अखिलेश यांनी निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असल्याचे वृत्त होते.
 

Web Title: 72 hours of civil strife?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.