अखंड पाठाची ७२ तासांनी समाप्ती भाविकांचा उत्साह शिगेला : हजारो सिंधी बांधवांची उपस्थिती

By admin | Published: October 22, 2016 12:53 AM2016-10-22T00:53:02+5:302016-10-22T00:53:02+5:30

जळगाव : सिंधी कॉलनीतील पूज्य सेवा मंडळात वर्सी महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारपासून सुरू झालेल्या अखंड भोग साहेबमध्ये संतांनी श्लोक म्हटले व या पाठाची ७२ तासांनंतर समाप्ती झाली. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत आणखीनच वाढविली. या कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी एका पेक्षा एक कलाविष्कार सादर करीत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची सेवा मंडळ परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. या उत्सावामुळे या परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.

72 hours of intense reading ends the enthusiasm of devotees: The presence of thousands of Sindhi brothers | अखंड पाठाची ७२ तासांनी समाप्ती भाविकांचा उत्साह शिगेला : हजारो सिंधी बांधवांची उपस्थिती

अखंड पाठाची ७२ तासांनी समाप्ती भाविकांचा उत्साह शिगेला : हजारो सिंधी बांधवांची उपस्थिती

Next
गाव : सिंधी कॉलनीतील पूज्य सेवा मंडळात वर्सी महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारपासून सुरू झालेल्या अखंड भोग साहेबमध्ये संतांनी श्लोक म्हटले व या पाठाची ७२ तासांनंतर समाप्ती झाली. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत आणखीनच वाढविली. या कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी एका पेक्षा एक कलाविष्कार सादर करीत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची सेवा मंडळ परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. या उत्सावामुळे या परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.
भंडार्‍याचा घेतला हजारोंनी लाभ
शहरातील सिंधी समाजबांधवांनी शुक्रवारी त्यांची दुकाने बंद ठेवत सकाळी नऊ वाजता पूज्य सेवा मंडलात एकत्र जमले. प्रत्येकाने आपआपल्या परीने सेवा मंडलात सेवा देण्याचा प्रयत्न केला. दुपारी १ वाजता भाविकांना भंडारा वाटप सुरू झाले. सायंकाळपर्यंत येणार्‍या भाविकांना भंडारा दिला जात होता. भोग साहेबचा प्रसाद मानल्या जाणार्‍या या भंडार्‍याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे हा प्रसाद घेतल्यानंतर अनेक भाविक मिळेल त्या वाहनाने परतात.
मंगलमय वातावरण
सायंकाळी सहा वाजता सेवा मंडल परिसरात संतांनी भोग साहेबचे श्लोक म्हटले. त्यामुळे येथील वातावरण मंगलमय झाले होते.
प्रवचनातून प्रबोधन
मथुरा येथील राधे नंदिनी यांचेआध्यात्मिक प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी अध्यात्मासह आजची पिढी मोबाईल, इंटरनेट, व्हॉटस्अप यामुळे कशी भरटकली आहे, या बद्दल मार्गदर्शन करून तरुणांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यानंतर संत बाबा हरदासराम म्युझिक पार्टीच्या रतन जाधवाणी यांनी सादर केलेल्या संगीतमय भजनाने रंगत आणली. या सोबतच इंदूर येथील व मुंबई येथील कलाकारांनी संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कॉमेडी नाईटस्ने मनोरंजन
जळगावातीलच सोनू मंधान याने सादर केलेल्या कॉमेडी नाईटस् विथ कपिल या कार्यक्रमाने तर सर्वांना पोट धरून हसविले. या कार्यक्रमाने भाविकांचे चांगलेच मनोरंजन केले.
भाविकांची निस्वार्थ सेवा
शुक्रवारी दिवसभरात देशभरातून हजारो भाविकांनी भेट दिली. याप्रसंगी सेवा मंडळातर्फे भाविकांसाठी जेवण, नाश्ता व चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. मंडळाच्या बाहेर मोफत पाण्याचे वितरण तीन दिवसांपासून करण्यात येत आहे. हजारो सिंधी बांधवांची उपस्थिती होती.

Web Title: 72 hours of intense reading ends the enthusiasm of devotees: The presence of thousands of Sindhi brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.