जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या
By admin | Published: July 12, 2016 12:10 AM2016-07-12T00:10:09+5:302016-07-12T00:10:09+5:30
जळगाव : जिल्ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे.
Next
ज गाव : जिल्ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे.रविवार सकाळ पासूनच जिल्ात पावसाला सुरुवात झाली. जिल्ात बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ात एकूण सरासरी ५८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात एकूण सरासरी १०७ मि. मी. पाऊस झाला आहे. ७२ टक्के पेरण्या...समाधानकारक पावसामुळे पेरण्यांनाही वेग आला असून ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ात एकूण खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र ८ हजार ३३२.१६ हेक्टर असून त्यापैकी ६१२१.५३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. सर्वाधिक क्षेत्र कपाशी खाली असून ५३१३.९९ हेक्टर अनुमानित क्षेत्रापैकी ३६४०.२८ हेक्टर क्षेत्रावर (६८.५० टक्के) क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. तेलबियाखालील क्षेत्र २९९.५७ हेक्टर असून त्यापैकी २८६.६९ हेक्टर क्षेत्रावर (९५.७० टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत. तेलबियांमध्येही सोयाबीन खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनखाली १६८.६७ हेक्टर क्षेत्र असण्याचे अनुमान होते मात्र प्रत्यक्षात २४६.७८ हेक्टर क्षेत्रावर (१४६.३१ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्य पिकांमध्ये ज्वारीचे क्षेत्र ८०३.२० हेक्टर असून ४२८.२ हेक्टर (५३.२९ टक्के) क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. बाजरीचे लागवड क्षेत्र २१६.८१ हेक्टर असून ११८.६ हेक्टर क्षेत्रावर (५४.४५ टक्के), पोरणी मक्या खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मक्याचे अनुमानित क्षेत्र ७५१.९५ हेक्टर असून प्रत्यक्षात ८१५.५२ हेक्टर क्षेत्रावर(१०८.४५ टक्के) मक्याची पेरणी झाली आहे. कडधान्य पिकात तुरी खालचे क्षेत्र वाढले आहे. १७०.४७ हेक्टर अनुमानित क्षेत्रापैकी प्रत्यक्षात १८६.९३ (१०९.६६ टक्के) हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली आहे. तर मुगाचे क्षेत्र ३६२.१० हेक्टर असून ३२९.२७ हेक्टर (९०.९३ टक्के) क्षेत्रावर मुगाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. उडीद पिकाखाली ४११.६१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३१०.२९ हेक्टर (७५.३७ टक्के) क्षेत्रावर उडीद लागवड झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यावर आणखी पेरण्यांना आणि आंतर मशागतीच्या कामांना वेग येईल, त्यामुळे येत्या आठवडाभरात पेरणी क्षेत्रात वाढ झालेली असेल, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.