73 टक्के भारतीय प्रमोशनच्या अपेक्षेवर
By admin | Published: May 6, 2016 09:47 AM2016-05-06T09:47:45+5:302016-05-06T09:47:45+5:30
देशातील 73 टक्के कर्मचा-यांना पुढील वर्षी प्रमोशन मिळण्याची अपेक्षा आहे. मायकल पेज इंडियाज जॉब कॉन्फिडन्स इंडेक्सने भारतीय कर्मचा-यांवर केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 06 - देशातील 73 टक्के कर्मचा-यांना पुढील वर्षी प्रमोशन मिळण्याची अपेक्षा आहे. मायकल पेज इंडियाज जॉब कॉन्फिडन्स इंडेक्सने भारतीय कर्मचा-यांवर केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. 62 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीवर समाधानी आहेत. सर्व्हेतून आलेल्या माहितीनुसार गेल्या तिमाहीशी तुलना करता कर्मचा-यांचा आत्मविश्वासात खालावला आहे.
मध्य आणि वरिष्ठ पदावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांवर हा सर्व्हे करण्यात आला. 4 मेट्रो शहरांमधील सर्व विविध संस्था आणि क्षेत्रातील एकूण 688 कर्मचा-यांवर हा सर्व्हे करण्यात आला. भारतातील 62 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीवर समाधानी असून आशिया पॅसिफिकमध्ये हे प्रमाण 54 टक्के आहे. भारतामध्ये बंगळुरुमध्ये यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. बंगळुरुतील 75 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीत समाधानी आहेत.
भारतामध्ये नोकरी शोधण्यासाठी असलेली तीन महत्वाची कारणे नवीन कौशल्य विकास, पगार आणि कामावर चांगल्या सुविधा ही आहेत. 42 टक्के लोकांनी नवीन कौशल्य विकासला प्राधान्य दिलं आहे तर 40 टक्के पगार आणि 39 टक्के लोकांनी कामावरील सुविधांना प्राथमिकता दिली आहे.