हिमाचल प्रदेश निवडणुकीती ७४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:45 AM2017-11-10T00:45:21+5:302017-11-10T00:46:22+5:30
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जांगासाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राज्यातील ७४ टक्के मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मागील विधानसभा निवडणूक आणि २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहेत. राज्यभरातील मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार असून, त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
हिमाचल प्रदेश- निवडणूक... कु ल शब्द(91)
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जांगासाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राज्यातील ७४ टक्के मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मागील विधानसभा निवडणूक आणि २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहेत. राज्यभरातील मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार असून, त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
२०१२ मधील विधानसभा निवडणुकीत ७३.५ टक्के, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६४.४५ टक्के मतदान झाले होते. यावेळीही राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. कोठेही हिंसक घटना घडली नाही, असे उपमुख्य निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना यांनी सांगितले.