जानेवारीपासून दगावले ७४ वाघ
By admin | Published: June 30, 2016 05:41 AM2016-06-30T05:41:29+5:302016-06-30T05:41:29+5:30
भारतात यावर्षी १ जानेवारी ते २६ जून या काळात ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली- भारतात यावर्षी १ जानेवारी ते २६ जून या काळात ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या शिकारीच्या घटनाही वाढल्या आहेत. एका वन्यजीव स्वयंसेवी संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले.
१४ वाघांना विजेचा धक्का व विषप्रयोगाद्वारे ठार करण्यात आले, तर काहींचा शिकाऱ्यांच्या गोळीने वेध घेतला. यापैकी बहुतांश वाघांचे सांगाडे हाती लागले आहेत. पोलीस आणि वन्यजीव प्रशासनाने याच काळात आणखी
१६ वाघांच्या शरीराचे भाग जप्त
केले असून, त्यामुळे दगावलेल्या वाघांची संख्या ३० वर गेली आहेआजार, वार्धक्य व अस्पष्ट कारणांमुळे आणखी २६ वाघांचा मृत्यू झाला, तर आपसातील संघर्षात १२ वाघांनी जीव गमावला. दोन वाघांचा मानवाबरोबरच्या संघर्षात, इतर प्राण्यांसोबतच्या संघर्षात एक आणि वाहन किंवा रेल्वेच्या धडकेने तीन वाघांना प्राणास मुकावे लागले.२०१६ मधील वाघांच्या मृत्यूवर दृष्टिक्षेप टाकल्यास सर्वाधिक मृत्यू मध्यप्रदेशात झाले. या राज्यात आतापर्यंत १९ वाघ दगावले. प्रत्येकी नऊ मृत्यूंसह महाराष्ट्र आणि उत्तराखंड दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
>2015मध्ये २६ वाघांची शिकार करण्यात आली. याशिवाय
इतर कारणांमुळे
६५ वाघांचा मृत्यू झाल्याने गेल्यावर्षी
ही संख्या ९१ वर पोहोचली होती.
मात्र, यावर्षी पहिल्या सहामाहीतच
७४ वाघ दगावले.
>2226वाघ भारतात आहेत