CoronaVirus News: तिरुपती देवस्थानचे ७४३ कर्मचारी कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:02 AM2020-08-11T07:02:33+5:302020-08-11T07:02:45+5:30
तिघांचा झाला महामारीने मृत्यू
तिरुपती : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान भाविकांना ११ जून रोजी दर्शनासाठी खुले केल्यापासून देवस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहेश तर अन्य ७४३ कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे.
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमारसिंग यांनी ही माहिती देताना सांगितले की, गेल्या महिनाभरात देवस्थानच्या एकूण ७४३ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४०२ कर्मचारी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, तर बाकीच्या ३३८ कर्मचाºयांवर उपचार सुरू आहेत. यासाठी देवस्थानची श्रीनिवासम, विष्ण्ुूनिवासम व माधवम ही विश्रामगृहे कोविड-१९ केंद्रे म्हणून वापरण्यात येत आहेत. सिंग म्हणाले की, जुलै महिन्यात देशभरातून आलेल्या २.३८ लाख भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी रोजचा कोटा नऊ हजारांचा आहे. शनिवारी ८ आॅगस्ट रोजी सुमारे ८,५०० भाविक दर्शनासाठी आले. येथे देशभरातून भाविक दर्शनाला येतात. (वृत्तसंस्था)