एमयूटीपी-2साठी 746 कोटी मंजूर

By Admin | Published: November 28, 2014 01:57 AM2014-11-28T01:57:45+5:302014-11-28T01:57:45+5:30

रेल्वे मंत्रलयाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतील (एमयूटीपी) दुस:या टप्प्यासाठी 2क्14-15 साठी 746 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

746 crore approved for MUTP-2 | एमयूटीपी-2साठी 746 कोटी मंजूर

एमयूटीपी-2साठी 746 कोटी मंजूर

googlenewsNext
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रलयाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतील (एमयूटीपी) दुस:या टप्प्यासाठी 2क्14-15 साठी 746 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या दुस:या टप्प्याचा खर्च 1 हजार 927 कोटी रुपये एवढा असून, उर्वरित खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतील दुस:या टप्प्यात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कुल्र्यार्पयत पाचवा आणि सहावा मार्ग उभारण्यात येणार आहे. 2क्क्8-क्9 साली या कामासाठी 5 हजार 3क्क् कोटी रुपये मंजूर झाले होते. या टप्प्यात ठाणो ते दिवा असा मार्ग उभारण्यात येणार आहे. 
तसेच हार्बर मार्गावरील अंधेरी ते गोरेगावर्पयतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचा समावेश आहे. 864 कोच, मध्य रेल्वेवरील डीसी - एसी परावर्तन, स्थानक दर्जा सुधारण्यासह सहाव्या मार्गात मुंबई सेंट्रल ते बोरीवलीर्पयतच्या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.  
या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करणो आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणो यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत दिली.

 

Web Title: 746 crore approved for MUTP-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.