केंद्राने महाराष्ट्राला दिले ७४७२ कोटी रूपये; 'या' राज्याला मिळाला सर्वाधिक निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:14 PM2023-06-12T22:14:32+5:302023-06-12T22:15:32+5:30

या राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे

7472 crore as tax refund to Maharashtra from Central Government | केंद्राने महाराष्ट्राला दिले ७४७२ कोटी रूपये; 'या' राज्याला मिळाला सर्वाधिक निधी

केंद्राने महाराष्ट्राला दिले ७४७२ कोटी रूपये; 'या' राज्याला मिळाला सर्वाधिक निधी

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्व राज्यांना ५९,१४० कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून १,१८,२८० कोटी रुपये आज वितरित केले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून २०२३ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे.

या राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला तो २१ हजार २१८ कोटी तर त्या खालोखाल बिहारला ११,८९७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

वाटप केलेल्या रकमेचा राज्यनिहाय विभाजन तक्ता 

राज्यांना वाटप केलेली एकूण रक्कम - १ लाख १८ हजार २८० कोटी  
अनुक्रमांकराज्यांचे नाव एकूण रक्कम(कोटींमध्ये)
आंध्रप्रदेश ४७८७
अरुणाचल प्रदेश२०७८
आसाम ३७००
बिहार११८९७
छत्तीसगड ४०३०
गोवा४५७
गुजरात ४११४
हरियाणा १२९३
हिमाचल प्रदेश ९८२
१०झारखंड ३९१२
११कर्नाटक ४३१४
१२केरळ२२७७
१३मध्य प्रदेश ९२८५
१४महाराष्ट्र ७४७२
१५मणिपूर ८४७
१६मेघालय ९०७
१७मिझारोम ५९१
१८नागालँड ६७३
१९ओडिशा५३५६
२०पंजाब २१३७
२१राजस्थान ७१२८
२२सिक्किम ४५९
२३तामिळनाडू ४८२५
२४त्रिपुरा ८३७
२५उत्तर प्रदेश२१२१८
२६उत्तराखंड १३२२
२७पश्चिम बंगाल ८८९८
 एकूण ११८२८०


 

Web Title: 7472 crore as tax refund to Maharashtra from Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.