महापालिकेला ७५ कोटींचा निधी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:43+5:302015-02-14T23:51:43+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या विकासकामांवर येणार्या खर्चाच्या ७५ टक्के भार राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या आराखड्यानुसार ७५ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा कक्षाकडून वर्ग करण्यात आला आहे. महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपये अपेक्षित आहेत.
Next
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या विकासकामांवर येणार्या खर्चाच्या ७५ टक्के भार राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या आराखड्यानुसार ७५ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा कक्षाकडून वर्ग करण्यात आला आहे. महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपये अपेक्षित आहेत. नाशिक महापालिकेने सुमारे अकराशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी निधीची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारने हा सारा खर्च उचलावा, अशी महापालिकेची मागणी होती, परंतु शासनाने ७५ टक्के वाटा उचलण्याचे मान्य करून त्यापोटी आजवर सव्वातीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले, मात्र सुरू असलेल्या कामांच्या तुलनेत मिळालेला निधी अपुरा असल्याने महापालिकेने पुन्हा मागणी केल्याने गेल्या आठवड्यात कुंभमेळा कक्षाने ७५ कोटी रुपये नव्याने उपलब्ध करून दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा कक्षाकडे सव्वाशे कोटी रुपये शिल्लक होते, त्यापैकी महापालिकेला ७५ कोटी दिल्याने आता उरलेल्या निधीतून पुरातत्व खात्यानेही पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. कुंभमेळ्यातील कामांबाबत यंत्रणांकडून केल्या जात असलेल्या कामाच्या टप्प्यात निधीचे वितरण केले जात आहे. त्यामुळे अजूनही कुंभमेळा कक्षाकडे उपलब्ध असलेला निधी पुरेसा असून, मार्चमध्ये शासनाकडून उर्वरित निधी येण्याची अपेक्षा आहे. महापालिकेप्रमाणेच साधुग्रामसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेच्या भाड्यापोटीची रक्कमही उपलब्ध करून देण्यात आली असून, ती थेट शेतकर्यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या बॅँक खात्याची माहिती प्रशासनाला सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.