७५ पद्मश्री मानकऱ्यांमध्ये बहुसंख्य कलावंत, साहित्यिक
By admin | Published: January 26, 2017 01:44 AM2017-01-26T01:44:10+5:302017-01-26T01:44:10+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या ७५ ‘पद्मश्री’ पुरस्कारांमध्ये कलावंत (२१) व साहित्यिक (१७) बहुसंख्येने आहेत. प्रत्येकी ९ खेळाडूंना व समाजसेवकांना आणि ८ डॉक्टरांनाही जाहीर झाले आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या ७५ ‘पद्मश्री’ पुरस्कारांमध्ये कलावंत (२१) व साहित्यिक (१७) बहुसंख्येने आहेत. प्रत्येकी ९ खेळाडूंना व समाजसेवकांना आणि ८ डॉक्टरांनाही जाहीर झाले आहेत. तसेच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ६, नागरी सेवांमधील ३ मान्यवरांखेरीज कृषी, आध्यात्म व व्यापार-उद्योगातील प्रत्येकी एका मान्यवरास जाहीर झाले आहेत.
यंदा जाहीर झालेले ‘पद्मश्री’चे मानकरी
कला- बसंती बिश्त (संगीत, उत्तराखंड), संजीव कपूर (पाककला, महाराष्ट्र), सी. कुन्नीरामन नायर (नृत्य, केरळ), अरुणा मोहंती (नृत्य, ओडिशा), भारती विष्णुवर्धन (चित्रपट, कर्नाटक), साधु मेहेर ( चित्रपट, ओडिशा), टी. के. मूर्ती (संगीत, तमिळनाडू), लेशराम बिरेंद्रकुमार सिंग (संगीत, मणिपूर), कृष्णा राम चौधरी (संगीत, उत्तर प्रदेश), बाओआ देवी (चित्रकला, बिहार), तिलक गिताई (चित्रकला, राजस्थान), डॉ. येक्का यादगिरी राव (मीर्तिकला, तेलंगण), जितेंद्र हरिपाल (संगीत, ओडिशा), कैलाश खेर (संगीत, महाराष्ट्र), परसल्ला पोनम्मल ( संगीत, केरळ), सुक्री बोम्मगौडा( संगीत, कर्नाटक), मुकुंद नायक ( संगीत, झारखंड), पुरुषोत्तम उपाध्याय ( संगीत, गुजरात), अनुराधा पौडवाल (संगीत, महाराष्ट्र), वारेप्पा नबा निल (नाट्यकला, मणिपूर) व इमरत खान ( संगीत, अमेरिका).
साहित्य, शिक्षण, पत्रकारिता
बिरखा बहादूर मुरिंगला (सिक्कीम), एली अहमद (आसाम), डॉ. नरेंद्र कोहली (दिल्ली), प्रा. जी. व्यंकटसुबय्या (कर्नाटक), ए. अच्युतन नंबुद्री (केरळ), काशिनाथ पंडित (जम्मू-काश्मीर), चामू कृष्णा शास्त्री (दिल्ली), हरिहर कृपालू त्रिपाठी (उत्तर प्रदेश), मायकेल डॅनिनो (तमिळनाड), पूनम पुरी (दिल्ली), व्ही. जी. पटेल (गुजरात), व्ही. कोटेश्वरम्मा (आंध्र प्रदेश), बलबीर दत्त (झारखंड), भावना सोमय्या (महाराष्ट्र) विष्णू पंड्या (गुजरात), अनंत अगरवाल (अमेरिका)व एच. आर. शहा (अमेरिका).
क्रीडा
विराट कोहली (क्रिकेट, दिल्ली), शेखर नाईक (क्रिकेट, कर्नाटक), विशाखा गौडा ( थाळीफेक, कर्नाटक), दीपा मलिक (अॅथलेटिक्स, हरियाणा), मरियप्पन थंगवेलु (अॅ्रथलेटिक्स, तमिळनाड), दीपा कर्माकर ( जिम्नॅस्टिक्स, त्रिपुरा), पी. आर. श्रीजेश (हॉकी, हरियाणा), साक्षी मलिक (कुस्ती, हरियाणा) व मीनाक्षी अम्मा (मार्शल आर्ट, केरळ).
समाजसेवा
दारिपल्ली रामय्या (तेलंगण), गिरीश भारद्वाज (कर्नाटक), हरिमूल हक (प. बंगाल), बिपिन गणात्रा (प. बंगाल), विनेदिता रघुनाथ भिडे (तमिळनाड), अप्पासाहेब धर्माधिकारी (महाराष्ट्र), बाबा बलबीर सिंग सीचेवाल (पंजाब), डॉ. मापुस्कर (महाराष्ट्र, मरणोत्तर) व अनुराधा कोईराला (नेपाळ).
वैद्यकीय सेवा
डॉ. सुब्रतो दास (गुजरात), डॉ. भक्ती यादव (मध्य प्रदेश), डॉ. मोहम्मद अब्दुल वाहीद (तेलंगण), डॉ. मदन माधव गोडबोले (उत्तर प्रदेश), डॉ. देवेंद्र डाह्याभाई पटेल (गुजरात) प्रा. हरिखिशन सिंग (हरियाणा), डॉ. मुकुट मिन्झ (चंदिगढ) व सुनिती सॉलोमन (तमिळनाडू, मरणोत्तर).
विज्ञान, तंत्रज्ञान
अरुण कुमार शर्मा (भूगर्भशास्त्र, छत्तीसगढ), चंद्रकांत पिठावा (तेलंगण), प्रा. अजय कुमार रे (प. बंगाल), चिंताकिंडी मल्लेशम (आंध्र प्रदेश), जितेंद्र नाथ गोस्वामी (आसाम) व अशोक कुमार भट्टाचार्य (भूगर्भशास्त्र, प. बंगाल).