७५ टक्के नागरिकांची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना पसंती दिवाळीचा उत्साह : मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:08+5:302016-10-30T22:47:08+5:30
लातूर : पारंपरिक दिवाळीचा ट्रेंड आता बदलला असून, फराळ आणि कपड्यावरची दिवाळी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीत रुपांतर झाली आहे. गेल्या आठ दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली असून, प्रामुख्याने मोबाईल, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन / होमथिएटर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घरा-घरांत आता दिसून येत आहे.
Next
ल तूर : पारंपरिक दिवाळीचा ट्रेंड आता बदलला असून, फराळ आणि कपड्यावरची दिवाळी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीत रुपांतर झाली आहे. गेल्या आठ दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली असून, प्रामुख्याने मोबाईल, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन / होमथिएटर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घरा-घरांत आता दिसून येत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानातील उपकरणांसोबत दिवाळी साजरी करण्याचा नवा लुक गेल्या काही वर्षांत रुढ झाला आहे. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी आपली दिवाळी या साहित्य खरेदीतून अपडेट केली आहे. हातातील स्मार्ट फोनमुळे स्मार्ट व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा दिवाळीनिमित्त अनेकांचा प्रयत्न असतो. बदलत्या तंत्रज्ञानाला सोबती म्हणून ही दिवाळी साजरी केली जात आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी येणारे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत. यातून जगणे सुस होत असल्याने अनेकजण दिवाळी आणि विजयादशमीच्या मुहूर्तांवर या साधनांची खरेदी करतात. अल्पावधीत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये नवनव्या प्रोग्रॅमवर आधारित उपकरणांची कंपन्यांकडून निर्मिती केली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या एखाद्या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला नव्याने दाखल झालेल्या वस्तूने मागे टाकण्याचा पायंडा आता रुजला आहे. मोबाईलच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनव्या संशोधनावर क्रांती घडू लागली आहे. आज घेतलेला मोबाईल उद्या जुना वाटू लागला आहे. एवढे मोबाईल क्षेत्र अपडेट होताना दिसून येत आहे. घरगुती उपकरणांना पसंती... गृहिणींचे दैनंदिन जीवन सुस करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात दाखल झालेल्या रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, फ्रीज आदी साहित्यांना महिला वर्गातून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही (एलईडी) आणि होम थिएटर या उपकरणांनाही मोठी मागणी आहे. ही उपकरणे घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. मोबाईल्सचे नवे लूक... मोबाईलच्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे. सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षणा-क्षणाला अपडेट होत असल्याने मोबाईल्सचे नवे लूक दिवसागणिक बाजारात दाखल होऊ लागले आहेत. किमान १० हजार रुपयांपासून १ लाख रुपये किंमतीचे स्मार्ट फोन दाखल झाले आहेत. या स्मार्ट फोनमुळे पेपरलेस वर्क करणे सोयीचे ठरू लागले आहे. याही बाजारात दिवसाला कोट्यवधींची उलाढाल आहे.