जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात ७५ रजिस्टर जीर्ण : भांडार विभागाला तब्बल १० वेळा पत्र देऊनही दुर्लक्ष
By admin | Published: June 14, 2016 12:22 AM2016-06-14T00:22:05+5:302016-06-14T00:22:05+5:30
जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे.
Next
ज गाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे. मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे दाखले नागरिकांना विविध शासकीय व शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असतात. मात्र या महत्वाच्या विभागाबाबत मनपा प्रशासनाची अत्यंत अनास्था असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड गहाळजुनी नपातून मनपाच्या इमारतीत स्थलांतर करताना जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे अनेक रजिस्टरच गहाळ झाले आहेत. त्यात जन्माच्या नोंदींचे १९५६, १९७७, १९७९, १९६७, १९६८च्या डिसेंबर महिन्याच्या नोंदी असलेले रजिस्टर गहाळ झाले आहेत. तर मृत्यूच्या १९५२, १९५३,१९५४, १९५६, १९५९, १९६१ यावर्षीर्ंच्या नोंदीचे रजिस्टर गहाळ झाले आहेत. त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील टिपणीही तयार आहे. मात्र तरीही आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कालावधीत जन्म अथवा मृत्यूची नोंद असल्यास त्याचे दाखले नागरिकांना मिळू शकत नाहीत. त्यांना कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र करून घेण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मनपाच्या चुकीची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहे. संगणकीकरण आवश्यकजन्म-मृत्यूच्या नोंदींचे रजिस्टर ठेवण्यासोबतच त्यांचे संगणकीकरणही करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही मनपाचे दूर्लक्ष झाले आहे. या विभागातील रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. मनपात १९०१ पासूनच्या नोंदींचे रेकॉर्ड आहे. त्यापैकी १९०० ते १९२३ पर्यंतच्या नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या आता कुणालाच वाचता येत नसल्याने ते रजिस्टर पडून आहेत. मात्र १९२३ पासूनचे रेकॉर्ड मराठीत आहे. ते हाताळून जीर्ण झाले आहे. अगदी २०१३ च्या नोंदींचे रजिस्टर देखील जीर्ण होऊन त्यातील पाने मोकळी झाली आहेत. याबाबत भांडार विभागाला पानांचे लॅमिनेशन व रजिस्टरचे बाईंिडंग करण्याबाबत तब्बल १० वेळा पत्र लिहून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. इतर अडचणींकडेही कानाडोळाजन्म-मृत्यू नोंद विभागातील मृत्यू पावती पुस्तके, मृत्यू फॉर्म नं.४ इंग्रजी, जन्म-मृत्यू पुस्तके नोंदणी रजिस्टर व अनुपलब्धता प्रमाणपत्र व त्याचे मुळ कव्हरिंग लेटर संपलेले आहे. त्याबाबतही पाठपुरावा सुरूआहे.