VIDEO: सोशल मीडियावर 75 वर्षीय आजीच्या 'सोलर पॅनल'चीच चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:05 PM2019-01-30T12:05:00+5:302019-01-30T12:07:58+5:30

कर्नाटकातील एका 75 वर्षीय आजीने मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सेलवम्मा असे या आजीचे नाव आहे. 

75-year-old street vendor now uses solar power to roast corn in style. Watch viral video | VIDEO: सोशल मीडियावर 75 वर्षीय आजीच्या 'सोलर पॅनल'चीच चर्चा  

VIDEO: सोशल मीडियावर 75 वर्षीय आजीच्या 'सोलर पॅनल'चीच चर्चा  

Next
ठळक मुद्देभाजलेले मक्क्याचे कणीस विकण्याचे काम सोशल मीडियावर सेलवम्मा आजीची चर्चा'मेहनत कमी, नफा जास्त'

बंगळुरु : कर्नाटकातील एका 75 वर्षीय आजीने मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सेलवम्मा असे या आजीचे नाव आहे. 

सेलवम्मा आजी बंगळुरुमध्ये विधानभवनासमोर भाजलेले मक्क्याचे कणीस विकण्याचे काम करते. तिने मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी चक्क आपल्या ठेल्यावर सोलर पॅनलचा वापर सुरु केला आहे. यामुळे तिचा कोळशाचा निम्मा खर्च वाचत आहे. तसेच, तिला मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी हाताने हवा घालावी लागत नाही. कारण, सोलर पॅनलमध्ये एक डीसी फॅन आहे. तसेच, छोटी लीथियम-आयन बॅटरी सुद्धा आहे. 


या आजीला सोलर पॅनल एका स्वयंसेवी संस्थेने दिला आहे. याविषयी बोलताना या आजीने सांगितले की, घराशेजारी असलेल्या स्वयंसेवी संस्थेने मला सोलर पॅनल दिला आहे. याआधी मला मक्काचे कणीस भाजण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत होती. मात्र, आता या सोलर पॅनलमुळे मेहनत कमी झाली असून नफा जास्त होत आहे. 




 

Web Title: 75-year-old street vendor now uses solar power to roast corn in style. Watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.