रेल्वे देणार कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 03:51 AM2016-09-26T03:51:28+5:302016-09-26T03:51:28+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून, यंदा त्यांना ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक संकटानंतर या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्याची तयारी सुरू आहे.
नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून, यंदा त्यांना ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक संकटानंतर या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्याची तयारी सुरू आहे.
मागील वर्षीही एवढाच बोनस मिळाला होता. नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वे मॅनचे महासचिव एम. राघवैया यांनी सांगितले की, आम्ही या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस देण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकार पुढील आठवड्यात घोषणा करू शकते. दसऱ्याच्या पूर्वी दरवर्षी रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. ७८ दिवसांचा बोनस म्हणजे प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला किमान १८ हजार रुपयांचा बोनस मिळू शकतो. रेल्वे सध्या उत्पन्नात १० हजार कोेटी रुपयांच्या तुटीचा सामना करीत आहे. हा बोनस दिल्यास रेल्वेवर दोन हजार कोटी रुपयांचा भार पडू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)