एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित; संसद सदस्यांवरील कारवाईचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:13 AM2023-12-19T06:13:42+5:302023-12-19T06:14:19+5:30
राज्यसभेतील ४५, लोकसभेतील ३३ सदस्यांवर कारवाई
संजय शर्मा / आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : खासदारांच्या निलंबनात इतिहास रचत नव्या संसदेने एकाच दिवशी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत कठोर नियमांचे पालन करण्याबाबत भाष्य केले होते. या निलंबनाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी १४ खासदारांना निलंबित केले होते.
संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सोमवारीही संसदेत मोठा गदारोळ झाला. कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली हाेती.
६४ खासदारांचे निलंबन ४ दिवसांसाठीच
संसदेत घुसखाेरीच्या मुद्यावरून घोषणाबाजी केल्याने आणि हातात फलक घेऊन कामकाजात व्यत्यय आणल्याने ही कारवाई करण्यात आली. लोकसभेचे सत्र २२ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने यापैकी ६४ सदस्य ४ दिवसांसाठी निलंबित झाले आहेत.
लाेकसभा अन् राज्यसभेत काय घडले?
लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी करत हातात फलक घेत विरोधक घोषणाबाजी करू लागले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की, आपण सदस्यांनी असा निर्णय घेतला होता
की, संसदेत अशा पोस्टरचा उपयोग होणार नाही. तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तीन सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या पोडियमपर्यंत
जाऊन घोषणा केल्याने त्यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित केले.
राज्यसभेत कामकाज ४ वाजता सुरू झाले तेव्हा लोकसभेतील घुसखोरीच्या मुद्द्द्यावर विरोधक आक्रमक झाले.
सुरक्षेतील त्रुटीबाबत सरकारने संसदेत उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करू लागले. राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर ४५ खासदारांना हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केले.
लोकसभेतील निलंबित खासदार
काँग्रेस (७)
अधीर रंजन चौधरी, अँटो अँटोनी, के. मुरलीधरन, के. सुरेश, अमर सिंह, राजा मोहन उन्नीथन, गौरव गोगई
तृणमूल काँग्रेस (९)
कल्याण बॅनर्जी, अपरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, सौगत राय, शताब्दी राय, असित कुमार मंडल, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तगीर, सुनील कुमार मंडल
द्रमुक (९)
टी. आर. बालू, ए. राजा, दयानिधी मारन, जी. सेल्वन, सी.एन. अन्नादुराई, डॉ. टी. सुमती, के. वीरासामी, एस. एस. पल्ली मणिक्कम, रामलिंगम
इंडियन युनियन मुस्लीम लीग (२)
केईटी मोहम्मद बशीर, के. नवासिकानी
आरएसपी (१) के. एन. के. प्रेमचंद्रन
जदयू (१) कौशलेन्द्र कुमार
व्हीसीके (१) तिरुवक्कससर
विशेषाधिकार समितीचा
अहवाल येईलपर्यंत निलंबित
के. जयकुमार, विजय वसंत,
अब्दुल खालिक (तिघेही काँग्रेस)
राज्यसभेतील निलंबित खासदार
काँग्रेस (१२)
प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारनभाई जे राठवा, सय्यद नासीर हुसेन, फुलोदेवी नेताम, शक्तिसिंह गोहिल, के. सी. वेणुगोपाल, रजनी पाटील, रणजित रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला
तृणमूल काँग्रेस (७)
सुखेंदू शेखर रे, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, संतनू सेन, मौसम नूर, प्रकाश चिक बराईक, समीरुल इस्लाम
द्रमुक (४)
एम. षण्मुगम, एन.आर. एलानगो, कनिमोझी एनवीएन सोमू, आर गिरिराजन
राजद (२) मनोज कुमार झा, फैयाज अहमद
माकपा (१) व्ही. शिवदासन
जदयू (२) रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे
राष्ट्रवादी काँग्रेस (१) वंदना चव्हाण
समाजवादी पार्टी (२) रामगोपाल यादव, जावेद अली खान
झामुमो (१) महुआ माजी
अन्य (२) जोस के. मणि, अजितकुमार भुइया
विशेषाधिकार समितीचा अहवाल
येईपर्यंत निलंबन कायम राहणार
जे. बी. माथेर हिशाम, एल हनुमंथय्या,
नीरज डांगी, राजमणी पटेल, कुमार केतकर, जी.सी. चंद्रशेखर, बिनॉय विश्वम,
संदोष कुमार पी., मोहम्मद अब्दुल्ला,
जॉन ब्रिटासँड, ए. ए. रहीम.