तब्बल ७८% भारतीयांचा मोबाइलमुळे होतोय ‘स्लीप डिव्होर्स’! 'जागतिक झोप सर्वेक्षणा'त दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:09 IST2025-03-29T16:09:30+5:302025-03-29T16:09:55+5:30
'या' कारणांमुळे एकत्र झोपणे त्रासदायक

तब्बल ७८% भारतीयांचा मोबाइलमुळे होतोय ‘स्लीप डिव्होर्स’! 'जागतिक झोप सर्वेक्षणा'त दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मोबाइलचे व्यसन, घोरणे व वेगवेगळे झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्लीप डिवोर्स’ नावाचा नवीन ट्रेंड देशात रूढ होत आहे. स्लीप डिवोर्सला कायदेशीर घटस्फोट म्हणता येणार नाही. मात्र, चांगली झोप होण्यासाठी दाम्पत्य वेगवेगळ्या खोल्यांत झोपण्याचा निर्णय घेतात. भारत देशात ७८ टक्के दाम्पत्य नियमित अंतराने स्लीप डिव्हर्स घेत असल्याचा दावा जागतिक झोप सर्वेक्षणात केला आहे.
स्लीप डिवोर्समुळे तात्पुरत्या स्वरूपात झोपेची गुणवत्ता सुधारत असली तरी जास्त काळ तसे केल्याने नात्यांमधील भावनिक अंतर वाढू शकते, असे मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. धर्मदीप सिंग यांनी माहिती देताना सांगितले.
या कारणांमुळे एकत्र झोपणे त्रासदायक
- ६१% लोक एकटे झोपल्यानंतर शांतपणे, गाढ झोप घेतात.
- ३७% जोडपी सुट्टीदरम्यान वेगवेगळी झोपतात.
- ३२% घोरणे व जलद श्वास घेणे
- २४% कधीकधी वेगळे झोपतात.
- १९% जोडपी कायम वेगळे झोपण्यास पसंती देतात.
- १२% अस्वस्थता
- ०८% स्क्रीनचा वापर