देशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:51 PM2020-08-08T15:51:18+5:302020-08-08T16:09:06+5:30
देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम ३७० हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि सीएएबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने मोदी सरकारसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
आज तक इंडिया टुडेसाठी कार्वी इनसाइड्स लिमिटेड या संस्थेने केलेल्या या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी मोदींचे काम खूप चांगले किंवा चांगले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ३० टक्के लोकां मोदींची कामगिरी उत्कृष्ट तर ४८ टक्के लोकांनी चांगली असल्याचे सांगितले. १७ ट्के लोकांच्या म्हण्यानुसार मोदींची कामगिरी सामान्य असल्याचे तर पाच टक्के लोकांनी वाईट असल्याचे सांगितले.
दरम्यान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही कुठल्याही नेत्याला मोदींच्या आसपासही जाता आले नाही. या सर्वेनुसार नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून लोकप्रिय आहेत. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे ६६ टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सांगितले. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्या स्थानी राहिले. सर्वेमधील आठ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ४ टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रत्येकी तीन टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती मिळाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रत्येकी दोन टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी