मेहरुण तलावातून ७९ डंपर गाळ काढला
By admin | Published: May 16, 2016 12:41 AM2016-05-16T00:41:18+5:302016-05-16T00:41:18+5:30
जळगाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Next
ज गाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांपासून तलावातील गाळ काढला गेला नव्हता. यावर्षी तलावातील पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाले. तलावाच्या कोरड्याभागातून गाळ काढला जावा अशी मागणी होत होती. त्यानुसार महापालिका, जलसंपदा विभाग व जैन उद्योग समूहाने पुढाकार घेऊन गेल्या तीन दिवसांपासून मेहरूण तलावातून गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ७९ डंपर गाळ काढलामेहरूण तलावात गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाचे ३ डंपर, एक मोठा पोकलॅँड, दोन जेसीबी अशी साधने उपलब्ध आहेत. तर जैन उद्योग समूहाचे एक जेसीबी व चार डंपर गाळ उपसण्याचे काम करीत आहेत. रविवारी दिवसभरात तलावातील ७९ डंपर गाळ काढण्यात आला. शनिवारपर्यंत २२५ ब्रास गाळ काढण्यात आला होता. शेतकर्याने नेला चार डंपर गाळ...रविवारी एका शेतकर्याने येथील चार डंपर गाळ नेल्याचे सांगण्यात आले. गाळ नेल्यास प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापर्यंत काढणार गाळ...दोन वर्षांपासून तलावातील गाळ काढला न गेल्याने तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे आता सुरू केलेली ही मोहीम पावसाळ्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. कदाचित पावसाळा सुरू झाला तरी गाळ काढणे पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जो पर्यंत तलावात पाणी येत नाही तो पर्यंत गाळ काढणे सुरूच राहणार आहे. अडीच फूट गाळ...तलावातून जो पर्यंत मुरुम लागत नाही तो पर्यंत गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये तलावाच्या मध्यभागी साधारण दोन ते अडीच फुटापर्यंत तर आजूबाजूला त्या पेक्षा कमी गाळ असण्याची शक्यता आहे. तो पूर्ण गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाळ तलावाच्या बाजूला...तलावातून काढलेला हा गाळ तलावाच्या आजुबाजूला टाकला जात आहे तर खाजगी डंपर इतरत्र नेत असल्याचे सांगण्यात आले. तलावाच्या बाजूला एवढा गाळ टाकायचा म्हटल्यास जागा अपूर्ण पडणार आहे, असेही सांगण्यात आले.