7th Pay Commission: नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:09 PM2022-08-23T13:09:00+5:302022-08-23T13:10:37+5:30

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ

7th pay commission latest update da hike and fitment factor may be decided in next month | 7th Pay Commission: नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार!

7th Pay Commission: नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार!

Next

नवी दिल्ली-

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ, थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून यासंदर्भात निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारात मोठा फायदा होणार आहे. 

४ टक्के महागाई भत्त्यात वाढीची शक्यता
माध्यमांमधील माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. जुलैच्या अखेरपर्यंत महागाई भत्त्यातील वाढीबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता याआधी वर्तविण्यात आली होती. पण तसं काही झालं नाही. आता नवरात्रीआधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्राकडून महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा ३४ टक्के महागाई भत्ता वाढून ३८ टक्के इतका होईल. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये यावर्षी मार्च महिन्यात वाढ केली होती. मार्च महिन्यात ३ टक्के वाढ करण्यात आली होती आणि महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्के झाला होता. डीए हा कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरचाच भाग आहे. 

सरकार महागाईचा दर पाहून डीए बाबतचा निर्णय घेत असतं. जेणेकरुन कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार नाही. सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ झाल्यास देशातील ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाख पेंशनधारकांना मोठा फायदा होणार आहे. 

AICPI ची महत्वाची भूमिका
सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी एआयसीपीआय इंडेक्स अत्यंत महत्वाचा ठरतो. जूनचा AICPI चा इंडेक्स १२९.२ पॉइंटवर आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ होईल अशी शक्यता आहे. फेब्रवारीनंतर AICPI इंडेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

जानेवारी २०२२ मध्ये इंडेक्सचा आकडा १२५.१ इतकी होती. फेब्रुवारीत हा आकडा १२५ आला होता. तर मार्चमध्ये पुन्हा वाढ होऊन १२६ इतका झाला. एप्रिलमध्ये इंडेक्सचा आकडा वाढून १२७.७ वर पोहोचला. पुढे इंडेक्समध्ये सातत्यानं वाढ होतच आहे. मे महिन्यात १२९, तर जूनमध्ये १२९.२ पॉइंटवर पोहोचला आहे. 

Web Title: 7th pay commission latest update da hike and fitment factor may be decided in next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.