१ जानेवारी पासून ७वा वेतन आयोग लागू होणार
By Admin | Published: November 19, 2015 08:38 PM2015-11-19T20:38:38+5:302015-11-19T21:23:52+5:30
७व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल केंद्रिय अर्थमंत्रालयाकडे आज सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे मूळ वेतनात १६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - ७व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल केंद्रिय अर्थमंत्रालयाकडे आज सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे मूळ वेतनात १६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. ७वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे, यामुळे १६ टक्के पगारवाढ, तर भत्त्यात ६३ टक्क्याने वाढ आणि २४ टक्के पेन्शन वाढणार आहे. तर वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी १८ हजार रुपये पगार मिळेल.
७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारी तिजोरीवर १,०२,००० कोटींचा भार पडणार असल्याची माहीती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ७ व्या वेतन आयोगाचा ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तर ५५ लाख पेन्शनधारकांना फायदा मिळणार असल्याचे न्यायमूर्ती माथूर यांनी सांगीतले