'पाण्याच्या कमतरतेमुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:57 PM2019-06-25T13:57:29+5:302019-06-25T13:57:42+5:30
महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाण होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाण्याच्या गंभीर समस्येबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठवला. सन 2018 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून यंदाही 2019 मध्ये मान्सुन येण्यास विलंब झाल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी मिळेना झाले आहे.
महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाण होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, यामुळे जनावरांना चाराही मिळणार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन राज्याला मदतनिधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीहीही सुळे यांनी केली. तसेच, पाण्याच्या समस्येमुळे दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल आहे, अशी माहितीही सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करताना दिली.
Raised the Issue of Drought and Water Scarcity in Maharashtra as Matters raised under rule 377 in the Parliament. #MonsoonSessionpic.twitter.com/DO1ReqJI1w
— Supriya Sule (@supriya_sule) June 25, 2019
पानी की किल्लत के कारण हर दिन 8 किसानों के आत्महत्या की रिपोर्ट हैः सुप्रिया सूले, एनसीपी#प्रश्नकाल#LokSabhapic.twitter.com/UNoSamP6Cm
— Lok Sabha TV (@loksabhatv) June 25, 2019