सावधाssन; 8 लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपवर; लग्नाच्या गाठी होताहेत सैल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:09 PM2020-01-28T13:09:20+5:302020-01-28T14:01:15+5:30

जवळपास आठ लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपचा वापर करत आहेत.

8 lakh married Indians, mostly from Bengaluru, registered on extra-marital dating app | सावधाssन; 8 लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपवर; लग्नाच्या गाठी होताहेत सैल

सावधाssन; 8 लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपवर; लग्नाच्या गाठी होताहेत सैल

Next
ठळक मुद्देआठ लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपचा वापर करत आहेत. विवाहाबाह्य संबंधांच्या डेटिंग अ‍ॅपवर नोंदणी करण्यात आली असून बंगळुरूमधील लोकांची संख्या सर्वाधिक.डेटिंग अ‍ॅपच्या नोंदणीत 567 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ.

नवी दिल्ली -  सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून डेटिंग अ‍ॅप सध्या लोकप्रिय झाले आहे. भारतातही डेटिंग अ‍ॅपचा वापर हा जास्त केला जात आहे. साधारण अविवाहित तरुण-तरुणींचा अशा अ‍ॅपकडे कल हा अधिक असतो. मात्र आता विवाहीत मंडळी देखील डेटिंग अ‍ॅपचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास आठ लाख विवाहित भारतीय डेटिंग अ‍ॅपचा वापर करत आहेत. विवाहाबाह्य संबंधांच्या डेटिंग अ‍ॅपवर ही नोंदणी करण्यात आली असून बंगळुरूमधील लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे. 

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विवाहाबाह्य संबंधांच्या डेटिंग अ‍ॅपवर अनेकांनी नोंदणी केली आहे. यामुळे अनेक भारतीय आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. 2020 या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अ‍ॅपमध्ये दररोजच्या सबस्क्रिप्शनमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपूर्ण महिन्याभरात जितकी नोंदणी होते ती जानेवारीच्या पहिल्या आठवडयात झाल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

डेटिंग अ‍ॅपवर नोव्हेंबर 2019 मध्ये बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा, विशाखापट्टणम, नागपूर, सूरत आणि भुवनेश्वर या शहरातील पुरुषांनी नोंदणी केली होती. तर बंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, इंदूर, सूरत, गुवाहाटी, नागपूर आणि भोपाळ या शहरातील महिलांनी अ‍ॅपवर नोंदणी केली. 

डेटिंग अ‍ॅपच्या नोंदणीत 567 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. नववर्षाच्या निमित्ताने विवाहित मंडळी विवाहबाह्य संबंधांसाठी नवीन पार्टनर शोधत असल्याचं फ्रेंच ऑनलाईन डेटिंग साईटने म्हटलं आहे. तसेच दिवसागणिक डेटिंग अ‍ॅपची लोकप्रियता देखील वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी 2019 मध्येही असाच ट्रेंड पाहायला मिळाला होता. एकंदरीत डेटिंग अ‍ॅपचा वाढलेला वापर पाहून जवळपास आठ लाख भारतीय आपल्या पार्टनरला धोका देत असल्याचं दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Video : '...तर ते तुमच्या घरात घुसतील, बहीण-मुलीवर बलात्कार करतील'

सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

'दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट; मग ऊत येणे स्वाभाविकच नाही का?'

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त  

...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव

 

Web Title: 8 lakh married Indians, mostly from Bengaluru, registered on extra-marital dating app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.