8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात

By admin | Published: March 30, 2017 05:01 AM2017-03-30T05:01:46+5:302017-03-30T05:01:55+5:30

बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून

8 lakh new car used to be scattered | 8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात

8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात

Next

 नवी दिल्ली :  बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून देशभर बंदी घातली आहे. तसे निर्देश सरकारला दिले. या बंदीमुळे देशभरात तयार असणाऱ्या आणि नोंदणी न झालेल्या जवळपास आठ लाख नव्या कोऱ्या गाड्या भंगारात जाण्याची शक्यता आहे.
स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लक्षावधी लोकांच्या आरोग्याचे फार
फार महत्व आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायमुर्ती (पान ११ वर)


कंपन्यांकडील साठा

कंपन्यांकडे सध्या ९६,७२४ व्यावसायिक वाहने, सहा लाख ७१ हजार ३०८ दुचाकी, ४० हजार ४८ तीनचाकी आणि १६,0९८ कार्स अशी आठ लाख २४ हजार २७५ वाहने आहेत

31/12/2016पासून बीएस-४ च्या दुचाकी व व्यावसायिक वाहनांच्या साठ्यात वेगाने वाढ झाली आहे याचा अर्थ असा की वाहन उत्पादकांनी बीएस-४ चे उत्पादन वाढवले आहे, असे या तज्ज्ञाने म्हटले.

बीएस-४चे उत्पादन वाढवले
सध्या बाजारात बीएस-४ चे निकष पूर्ण करणाऱ्या 14.7लाख दुचाकी व 39646 व्यावसायिक  वाहने आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.याचा अर्थ असा की बाजारात आज बीएस-३ निकषांच्या दुचाकींच्या साठ्यापेक्षा बीएस-४ निकषांच्या दुचाकींचा साठा दुपटीपेक्षा जास्त आहे तसेच बीएस-४ चा व्यावसायिक वाहनांचा साठा बीएस-३ च्या न विकल्या गेलेल्या वाहनांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे.

न्यायालयाने सुनावले
बीएस-चार निकष एक एप्रिलापासून अमलात येणार आहेत हे माहीत असतानाही उत्पादकांनी बीएस-४ च्या निकषांनुसार वाहनांच्या उत्पादनासाठी कृती न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघडणी केली.
सरकारने वाहन उत्पादकांची बाजू घेऊन सध्याचा बीएस-३ वाहनांचा साठा विकण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली. नवे उत्सर्जन निकष २००५ व २०१० मध्ये सक्तीचे केले गेल्यानंतर जुना वाहनांचा साठा विकण्यास परवानगी दिली गेल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.
जुने तंत्रज्ञान असलेल्या वाहनांच्या उत्पादनाला बंदी असली तरी सध्याचा वाहनांचा साठा विकण्यास ती नाही, असे सरकारने सांगितल्यानंतरही खंडपीठाने बीएस-३ वाहने रस्त्यावर आणण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title: 8 lakh new car used to be scattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.