‘हमीपत्रे घेऊन आठ डान्सबार परवाने द्या’
By admin | Published: May 11, 2016 04:07 AM2016-05-11T04:07:09+5:302016-05-11T04:07:09+5:30
लेखी हमीपत्र उद्या बुधवारी द्यावे व त्यानंतर राज्य सरकारने त्यांना गुरुवारी डान्सबारचे परवाने जारी करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
नवी दिल्ली: डान्सबारसाठी अर्ज केलेल्या मुंबईतील आठ हॉटेलचालकांनी, प्रत्यक्ष डान्स फ्लोअरवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कर्मचारी नेमणार नाही, असे लेखी हमीपत्र उद्या बुधवारी द्यावे व त्यानंतर राज्य सरकारने त्यांना गुरुवारी डान्सबारचे परवाने जारी करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने केलेल्या याचिकेवर न्या. दीपक मिश्रा आणि न्या. शिव किर्ती सिंग यांच्या खंडपीठाने हा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी होते की नाही याची खात्री करण्यासाठी पुढील सुनावणी शुक्रवारी १३ मे रोजी ठेवली.
अशी हमीपत्रे दिल्यावर ज्यांना परवाने मिळणे अपेक्षित आहे त्यांत एमआरए मार्ग व आझाद मैदानाजवळील प्रत्येकी एका व अंधेरीतील सात डान्सबारचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)