सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार; अजूनही शोधमोहीम सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:21 IST2025-02-01T17:07:33+5:302025-02-01T17:21:00+5:30
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत.

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार; अजूनही शोधमोहीम सुरूच
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. शनिवारी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सकाळी ८.३० च्या सुमारास ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गंगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक अजूनही सुरू आहे.
“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्यांची विशेष युनिट कोब्राचे सैनिक या कारवाईत सहभागी आहेत. पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही कारवाई सुरू करण्यात आली होती.