कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:07 AM2020-07-03T08:07:04+5:302020-07-03T08:07:17+5:30

त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले.

8 policemen including DSP martyred in firing in Kanpur | कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

Next

लखनऊः उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.



दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकात एक सीओ, एक एसओ, 2 एसआय आणि 4 जवान शहीद झाले असल्याचे परिसरातील डीएम यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांना दिले असून, त्यांनी घटनेचा अहवालही मागविला आहे. कानपूरमधील गुंडांच्या हल्ल्यात पोलीस शहीद झाल्यानंतर यूपीचे डीजीपी एचसी अवस्थी म्हणाले, 'जखमी झालेल्यांना शक्य तेवढे चांगले उपचार देणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. विकास दुबे हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यासाठी त्यांना शस्त्रे कोठून मिळाली, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्य डीजीपी म्हणाले की, जखमींना अधिक चांगले उपचार देण्याला आमचे प्राधान्य आहे. कानपूरची फॉरेन्सिक टीम आधीच घटनास्थळी पोहोचली आहे. लखनऊहून चौकशीसाठी फॉरेन्सिक टीमही पाठविण्यात आली आहे. गुंड आधीच घाबरून गेले होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे.

या हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी जेव्हा पोलीस पथक गेले, तेव्हा दुबे यांच्या टोळीतील गुंडांनी पोलिसांवरच गोळीबार केला. टोळीतील सदस्यांनी पोलिसांना घेराव घातला होता. पोलिसांना अशा हल्ल्याची अपेक्षा नव्हती. विकास दुबे येथून सुटल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी राज्यातील सर्व सीमा सील केल्या आहेत.

Read in English

Web Title: 8 policemen including DSP martyred in firing in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.