नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा ठार

By Admin | Published: October 24, 2016 01:11 PM2016-10-24T13:11:51+5:302016-10-24T13:14:55+5:30

पाकिस्तानने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले यामध्ये एक आठवर्षाचा मुलगा ठार झाला.

8-year-old son killed in Pakistan firing on Line of Control | नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा ठार

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा ठार

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २४ - पाकिस्तानने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले यामध्ये एक आठवर्षाचा मुलगा ठार झाला. जम्मू-काश्मिरच्या कानाचाक सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात एक आठवर्षांचा मुलगा ठार झाला आणि चार जण जखमी झाले. 
 
त्याआधी पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. रविवारी रात्री जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. 
 
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. भारतीय जवानही या गोळीबाराला जशास तसे उत्तर देत असून, मागच्या आठवडयात बीएसएफच्या कारवाईत सात पाकिस्तानी रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाला होता. 
 
 

Web Title: 8-year-old son killed in Pakistan firing on Line of Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.